712 अकोला : कीटकनाशकांच्या शास्त्रशुद्ध वापरासंबंधी कार्यशाळेचं आयोजन

28 Nov 2017 08:15 AM

कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. याच पार्श्वभुमीवर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रमुख पिकांवरील कीडनाशकांचा शास्त्रशुद्ध वापर हाच या कार्यशाळेचा विषय होता.यात प्रशिक्षण देताना प्रात्यक्षिकही करुन दाखवण्यात आले. यामध्ये राज्यभरातील कृषी विद्यालयातील प्राचार्य, कृषी समन्वयक आणि विषयतज्ञ, कृषी शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुखही हजर होते. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन याबाबतचं प्रशिक्षण देण्याचं आवाहनही करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV