712 : अमरावती : 44 प्रकारच्या शेवंतींच्या प्रदर्शनाचं आयोजन

21 Dec 2017 11:00 AM

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात फुलं एक विसाव्याचा क्षण देऊन जातात. या फुलांच्या अशा अनेक जाती आहेत ज्यांची माहिती फार कमी जणांना असते. शेवंतीच्या अशाच 44 जातींचं संवर्धन केलं आहे अमरावती जिल्ह्यातील डॉ. उर्मी शाह यांनी. नोकरी सांभाळत छंद म्हणून त्यांनी या फुलांचं संवर्धन केलं. या फुलांचं प्रदर्शनही त्यांनी यावेळी आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना फुलांच्या प्रजातींबाबत माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रदर्शनातील गर्दी बघता त्यांचा हा उद्देश सफल झाल्याचंच कळतंय.

LATEST VIDEOS

LiveTV