712 : राज्यातील 9 लाख 43 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

06 Dec 2017 08:39 AM

शेतकऱ्यांच्या एतिहासीक संपानंतर राज्यात कर्जमाफी जाहीर करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात सरकार कमी पडलं, अशी तक्रार शेतकरी करत होते. आता हळूहळू ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. आतापर्यंत 9 लाख 43 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलीय. ही रक्कम 5,141.97 कोटी इतकी आहे. बँकेकडे अजून 17 लाख 68 हजार शेतकऱ्यांची यादी आहे. त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी 10 हजार 632 कोटी रुपयेही देण्यात आलेत. येत्या 8 ते 10 दिवसात ही रक्कम जमा होईल असं सांगण्यात येतंय. एकूण 80 लाख शेतकऱ्यांना यात कर्जमाफी मिळणारेय.

LATEST VIDEOS

LiveTV