712 : ओखी चक्रीवादळामुळे कोकण, गोव्यासह विदर्भात पावसाच्या सरी बरसणार

06 Dec 2017 08:51 AM

ओखी चक्रीवादळाचा मोठा परिणाम राज्यातील हवामानावर होतोय. कोकण किनारपट्टी सोबतच अवघ्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसच विदर्भातही पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV