712 : नवी दिल्ली : देशातील साखर उत्पादन 39 लाख टनांवर

11 Dec 2017 09:36 AM

सध्या देशभरात ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. अशा वेळी देशातील साखर उत्पादनात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गाळप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यातच 39 लाख 51 हजार टन साखर उत्पादन झाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 42 टक्क्यांनी साखर उत्पादन वाढल्याचंही निदर्शनास आलं आहे. ही माहिती भारतीय साखर कारखानदार संघटना म्हणजेच इस्माने दिली आहे. यंदा देशात 251 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन 202 लाख टन इतकं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV