712 : देशभरात कापूस उत्पादनात 9 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज

14 Dec 2017 02:36 PM

कापूस सल्लागार मंडळानं नुकतंच देशातील आतापर्यंतच्या कापूस उत्पादना बाबतचा अहवाल जाहीर केला. यात देशातील कापूस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. तसच कापूस निर्यातीत १६ टक्क्यांनी वाढ होऊन, आयातीत मात्र ४५ टक्क्यांची मोठी घट होण्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. राज्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा कापूस उत्पादनावर विपरित परिणाम होताना दिसतोय. यंदा राज्यात कापसाचं लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा ४ लाख हेक्टरची वाढ नोंदवण्यात आली. मात्र उत्पादनात साडे तीन लाखांची घट होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणारेय.

LiveTV