712 कोल्हापूर : 6 एकर जागेत फ्लॉवर फेस्टिव्हलचं आयोजन

25 Dec 2017 09:00 AM

फुलोत्पादनामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प म्हणजेच केएसबीपी यांनी फ्लॉवर फेस्टीव्हलचं आयोजन केलंय. २४ पासून २८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणारेय. पोलिस उद्यानाच्या ६ एकर जमिनीवर हे प्रदर्शन उभारण्यात आलंय. यात दीड लाखाहून अधिक फुलझाडं आहेत. यात १०० हून अधिक जातीच्या फुलांचा समावेश आहे. अतिशय आकर्षक पद्धतीनं या प्रदर्शनात फुलांची मांडणी करण्यात आलीये. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही इथे उभारण्यात आलाय. रंगीबेरंगी सुगंधी दुनियेची सफर करायची असेल, तर या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्या.

LATEST VIDEOS

LiveTV