712 : राज्यातील केवळ तीन तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ

20 Dec 2017 02:03 PM

यंदा राज्यात पावसानं चांगली सुरुवात केली, मात्र नंतर बरेच दिवस दांडी मारली. यामुळे बहुतांश गावात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. राज्यात सुमारे १२५ तालुक्यात सलग ४५ दिवस पाऊस नव्हता. असं असतानाही फक्त ३ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राच्या सुधारीत दुष्काळ मॅन्युअलच्या निकशांमध्ये हे तीनच तालुके पात्र ठरलेत. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया यांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील पावसाचं प्रमाण,जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी आणि पीक पेरणी यांच्या आधारे दुष्काळाचं प्रमाण ठरवण्यात आलंय. या आधी केवळ पैसेवारीवर दुष्काळाचं प्रमाण ठरवलं जायचं. अशा वेळी गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असेल तरच एनडीआरएफ कडून मदत देण्यात येणार आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV