712 : यवतमाळ : बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

09 Dec 2017 09:18 AM

राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. हजारो तक्रारी कृषी विभागाकडे रोज येत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्य़ासाठी यवतमाळमध्ये कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. य़ा वेळी शास्त्रज्ञांनी काही सावधगीरीचे उपाय सांगीतले. त्यामध्ये मान्सून पूर्व लागवड न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश आणि कामगंध सापळे लावण्यासही सांगितलं. सोबतच फरदड न घेण्याचा महत्त्वाचा सल्लाही दिला.

LATEST VIDEOS

LiveTV