प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू, कुणाचा पगार किती वाढणार?

11 Oct 2017 11:36 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील प्राध्यापकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. कारण देशभरातल्या प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. देशभरातील तब्बल 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. हा आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे. त्यामुळे तब्बल 22 महिन्यांचा फरकही मिळणार आहे. आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने केंद्राच्या तिजोरीवर 22 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV