स्पेशल रिपोर्ट : महानायक अमिताभ बच्चन यांचं मराठीशी घट्ट नातं...

11 Oct 2017 02:54 PM

अमिताभ बच्चन... 
पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. त्यामुळेच वयाच्या 60त अमिताभ सुपरस्टार्स आणि मेगास्टार्सना टक्कर देत उभे राहिले.

आज त्यांच्या 75 वाढदिवशीसुद्धा सगळ्यात बिझी स्टार म्हणून ते परिचित आहेत. पण याच अमिताभ यांना हे यश दिलं ते महाराष्ट्रानं, त्यांचं मराठीशी आणि महाराष्ट्राशी असलेलं घट्ट नातं 2010 च्या पुण्याच्या साहित्य संमेलनात खुद्द अमिताभ यांनी उलगडून दाखवलं होतं. माझाच्या संग्रहातून त्यातला संपादित भाग

LATEST VIDEOS

LiveTV