माझा विशेष : गुजरातमध्ये काँग्रेसला अच्छे दिन?

24 Oct 2017 11:18 PM

खाकरा,फाफडा, ढोकळा या खमंग गुजराती पदार्थांप्रमणे गुजरातमधील निवडणूकाचं वातावरणही खमंग खुसखुशीत झालं. राजकारण प्रत्येक दिवशी नवं वळण घेत आहे. या सगळ्यात लक्षात येणारी गोष्ट म्हणजे, कांग्रेसची बदललेली नीती आणि राहुल गांधींची आक्रमक शैली. गुजरातमध्ये काँग्रेसनं भाजप विरोधी वातावरण तापवायला सुरवात केल आहे. ओबीसी समाजाचा कल्पेश ठाकोर, पाटीदार समाजाचा हार्दिक पटेल, दलित समाजाचा जिग्नेश मेवानी यांनी एकत्र येत काँग्रेसला दिलेला पाठिंबा. सोशल मीडियात काँग्रेसनं भाजपविरोधात केलेली वातावरण निर्मिती, नरेंद्र पटेल निखिल सावानी यासारख्या पाटीदार समाजाच्या नेत्यांनी भाजपवर केलेल गंभीर आरोप या सगळ्यामुळे गुजरातेत भाजपविरोधी हवा दिसून येत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू जालेली आह याचाच उहापोह आजच्या चर्चेत करायचा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV