माझा विशेष : ग्रामपंचायत निकालाचं गौडबंगाल!

11 Oct 2017 11:39 PM

गेले अनेक दिवस देशभरात विकास वेडा झालाय का अशा चर्चा होत्या. पण आता देशाचं माहिती नाही पण महाराष्ट्रात विजय नक्कीच वेडा होणार आहे. कारण विजयावर दोन मोठे राजकीय पक्ष दावा ठोकायला लागला आहे. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आणि 3131 ठिकाणचे निकालही लागले. पण आता भाजप आणि काँग्रेस, हे दोन्ही पक्ष ठिकठिकाणी आमचाच विजय झाल्याचा दावा करत आहेत. वास्तविक याची कोणतीही पक्षनिहाय आकडेवारी निवडणूक आयोगाकडेही नाहीये कारण ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. मग हे राजकीय पक्ष कशाच्या जोरावर विजयाचा दावा करत आहेत. आता प्रत्येकजण जिंकणार नाही म्हणजेच कोणीतही खोटं बोलत आहे. मग नक्की कोण खोटं बोलत आहे, या ग्रामपंचायत निवडणुकीचं गौडबंगाल नेमकं आहे काय?

LATEST VIDEOS

LiveTV