माझा विशेष : मोदींना 'नीच' म्हटल्यानं काँग्रेस गोत्यात?

07 Dec 2017 11:12 PM

मोदी नीच प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत अशा खालच्या शब्दात काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय. आज दिल्लीत नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचं उद्घाटन झालं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. मोदींच्या या आरोपांवर पलटवार करताना मणिशंकर अय्यर यांनी मोदी नीच प्रवृत्तीचे व्यक्ती असल्याची टीका केली. मात्र ही टीका करताना आपण देशाच्या पंतप्रधानांवर टीका करतोय याचं भान मणिशंकर अय्यर यांना राहीलं नाही..  मात्र खुद्द राहुल गांधींनी टीकेची झोड उठवल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी दिलगिरी व्यक्त केलेय....एवढं सुंदर हिंदी बोलणाऱ्या मणि शंकर अय्यर यांना नीच शब्दाचा अर्थ कळत नाही का,   पुरोगामी म्हणवणारे काँग्रेस नेते भान सोडून टीका कशी करायला लागले, या सगळ्या पुढे ऐन निवडणूकीचा काळ त्यात काँग्रेसमध्ये होत असलेला खांदेपालट अशा नाजुक परिस्थितीत असं वक्तव्य काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या असू शकते, आणि थेट पंतप्रधानांबद्दल खालच्या पातळीवर टीका झाल्यानं भाजपच्या हातात काँग्रेसनं आयतं कोलित दिलयं....

LATEST VIDEOS

LiveTV