माझा विशेष : फेरीवाल्यांना मनसे हटवू शकतं तर प्रशासन का नाही?

23 Oct 2017 11:15 PM

एलफिन्स्टनमधल्या चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरच्या कारवाईसाठी 15 दिवसांचं अल्टिमेटम दिलं होतं. डेडलाईन संपली आणि कालपासून मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खटॅक स्टाईलनं आंदोलन सुरू केलं. आज या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत डझनभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सांताक्रूझमध्ये मनसे पदाधिकारी अखिल चित्रें, ठाण्यात शहर अध्यक्ष अविनाश जाधवयांच्यासह काही कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. वास्तविक पाहता, कायदा हातात घेणं कधीही चूकच आहे. त्याचं समर्थन कोणीही करणार नाही. पण मनसेला कायदा हाता का घ्यावा लागला? मनसेच्या आंदोलनानंतर स्टेशन्सजवळ मोकळे फुटपाथ आणि रस्ते दिसायला लागलेच ना! मग प्रशासन अशी कारवाई का करत नाही? प्रशासन आणि फेरीवाल्यांचं साटं लोटं कसं आवरायचं? आणि आता बेकायदा फेरीवाल्यांना हटवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागणार का? याबाबत माझा विशेषमध्ये विशेष चर्चा

LATEST VIDEOS

LiveTV