माझा विशेष : सेक्स सीडीच्या गर्तेत गुजरातचं राजकारण?

13 Nov 2017 11:42 PM

निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये आता एका व्हिडीओने आणखी खळबळ उडाली आहे.

हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार, सध्या व्हॉट्सअपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.

पण हार्दिकचे विरोधक मात्र या व्हिडीओला प्रचंड व्हायरल करत आहेत. या व्हिडीओत एका रुममध्ये एक मुलगी आहे. त्या मुलीसोबत असणारी व्यक्ती हा हार्दिक पटेल असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे.

मात्र या व्हिडीओत आक्षेपार्ह काय आहे? असा सवाल हार्दिकचे समर्थक करत आहे.

दुसरीकडे हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV