माझा विशेष : शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक!

14 Oct 2017 09:12 AM

आज मुंबई महापालिकेत एकदम फिल्मी स्टाईल ड्रामा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेतील मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना शिवसेनेत सामील करून घेत, उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना शिवसेनेनं सुरूंग लावला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देखील शह दिला आहे. मनसे सोडणाऱ्या 6 नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी तयारी सुरु केली. पण पक्षाच्या परवानगीशिवाय नगरसेवक गट स्थापन करू शकत नाही असा दावा मनसेनं केला. तसंच गटनोंदणी टाळण्यासाठी भाजपची देखील धडपड सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV