माझा विशेष : महिला कर्मचाऱ्याच्या लिंगबदलाबाबत पोलीस दलाचा विरोध का?

20 Nov 2017 11:39 PM

बीडमधल्या माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिलेनं महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा मागितली होती, तसंच लिंगबदलानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती. मात्र पोलिस महासंचालकांनी महिलेला परवानगी नाकारली आहे.  त्यामुळे पुढचा लढा देण्यासाठी महिला आता कोर्टाचं दार ठोठावणार आहे. आपल्याकडे वारंवार अशी परिस्थती का येते. या महिलेला परवानगी का नाकारण्यात येते. ही मानवाधिकारांची पायमल्ली आहे का? पृथिका यशिनीपासून अनेकांना यासाठी न्यायालयाची वाट का पाहावी लागते

LATEST VIDEOS

LiveTV