मुंबई : नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी

01 Jan 2018 08:27 AM

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातूनच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही लाखो भाविक सिद्धीविनायकाच्या चरणी दाखल झाले. मंदिर व्यवस्थापनानं भक्तांच्या आग्रहास्तव खास मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला. डोळ्याला सुखावणाऱ्या फुलांनी मंदिराची खास सजावट करण्यात आली.तर दिपक केसरकर यांनीही मध्य रात्री सिद्धीविनायकाचं
दर्शन घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV