अहमदाबाद : शिवसेनेचं घूमजाव, गुजरातमध्ये सेना आता 40 जागा लढवणार

09 Nov 2017 08:45 PM

गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही, या भूमिकेवरुन शिवसेनेनं यू टर्न घेतला आहे. सेनेनं आता गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी 40 हून अधिक जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचे थेट परिणाम भाजपला भोगावे लागू शकतात. यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV