अहमदाबाद : मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शांहाची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, सूत्रांची माहिती

21 Nov 2017 10:57 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याचंही कळतंय. मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त गुजरात निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
त्याआधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला. मात्र चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत काहीही सांगितलं नाही. पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करु, असं राणेंनी म्हटलंय.

LiveTV