अहमदाबाद : मराठा क्रांती मोर्चासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेलला निमंत्रण

30 Dec 2017 09:09 PM

मराठा आंदोलनासाठी मराठा युवा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना निमंत्रण दिलंय. काल कार्यकर्त्यांनी अहमदाबादला हार्दिक पटेलची भेट घेऊन आमंत्रण दिलंय. आमंत्रण पत्रकात हार्दिक यांना जानेवारी किंवा फेब्रूवारी महिन्यातील मार्गदर्शन मेळाव्याकरिता तारिख मागण्यात आलीय.
दरम्यान हार्दिक पटेल यांनी याबाबतची पोस्ट फेसबुकवर व्हायरल केलीय. यात त्यांनी मराठा समाज आरक्षण, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, अरबी समुद्रात उभारण्या येणाऱ्या शिवाजी महाराजांचां पुतळा याकडे सरकारने केलेलं दुर्लक्ष याबाबत टिका केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV