गुजरातचा रणसंग्राम : काँग्रेसकडून विधानसभेसाठी 2 पाटीदारांनाच उमेदवारी, कार्यकर्ते आक्रमक

20 Nov 2017 11:36 AM

गुजरातमध्ये काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण यादीनंतर गुजरात काँग्रेस आणि पाटीदार नेत्यामध्ये जोरदार वाद झाला. 77 उमेदवारांच्या यादीत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या केवळ दोन जणांनाच उमेदवारी दिल्याने पाटीदार कार्यकर्त्यांनी जोरदार वादवादी केली.

अहमदाबादमध्ये गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोळंकी यांच्या घराबाहेर पाटीदारांनी गोंधळ घातला. हार्दिक पटेलच्या पादीटार अनामत आंदोलन समितीने काँग्रेसला पाठिंबा दिला असताना पाटीदारांना कमी उमेदवारी का असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला.

चर्चेशिवाय काँग्रेसने पाटीदार उमेदवारांची घोषणा केली, असं पीएएएसचे संयोजक दिनेश बामणिया यांनी म्हटलं आहे. सोळंकी यांच्या घराबाहेर तोडफोड केल्यामुळे पोलिस आणि पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.

LATEST VIDEOS

LiveTV