गुजरातचा रणसंग्राम : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या रोड शोला परवानगी नाकारली

11 Dec 2017 11:36 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारण्यात आली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. प्रचारात पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधीनी चागंलाच जोर लावला. जंगी सभा, रॅलीव्दारे प्रचार सुरु असून, प्रत्यक्ष भेटीवरही जोर दिला जातो आहे. असं असताना अहमदाबाद पोलिसांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल यांच्या रोड शो ला परवानगी नाकारल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV