अहमदनगर : एबीपी माझाच्या दणक्यानंतर कोपर्डीत बससेवा पुन्हा सुरु

11 Dec 2017 02:27 PM

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणानंतर देशभरात चर्चेत आलेल्या कोपर्डीत एबीपी माझाच्या दणक्यानंतर पुन्हा बससेवा सुरु झालीय. निर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर कुठलिही माहिती न देता बससेवा बंद करण्यात आली होती. कोपर्डीमध्ये चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी जावं लागतं. कोपर्डीनजिक मोठ्या प्रमाणात गायरान असल्यानं अनेक विद्यार्थिनी शाळेत जायला घाबरायच्या. सायकलवर शाळेत जातानाच नराधमांनी निर्भयावर बलात्कार करुन, तिची हत्या केली होती. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर कोपर्डीची बससेवा बंद केली होती. याचा पाठपुरावा एबीपी माझाने केल्यानंतर पुन्हा एकदा बससेवा सुरु करण्यात आलीय. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी बसचं श्रीफळ वाढवून स्वागत केलं. 

LiveTV