अहमदनगर : महाराष्ट्राचे मांझी भापकर गुरुजींच्या प्रयत्नांना यश, गुंडेगाव-पुणे बससेवा सुरु

09 Nov 2017 08:45 AM

भापकर गुरुजींनी बससेवा सुरु करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर आता पुन्हा गुंडेगाव ते पुणे बससेवा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव इथून पुण्याला जाणारी बस एसटी महामंडळाकडून बंद करण्यात आली होती. याविरोधात महाराष्ट्राचे मांझी अशी ओळख असलेल्या भापकर गुरुजींनी आंदोलनाचा इशारा देत वेळ पडल्यास आत्मदहन करेन असं सांगितलं होतं. या संदर्भातली बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर एसटी महामंडळाला जाग आली आहे. त्यामुळे गुंडेगाव ते पुणे बससेवा पुन्हा सुरु करण्यात आलीय..

LATEST VIDEOS

LiveTV