अहमदनगर : कोपर्डीचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

15 Dec 2017 03:27 PM

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलंय. कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपास केल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. यापुढेही आपल्याकडून अशीच गौरवास्पद कामगिरी होईल आणि महाराष्ट्र पोलिसांचं नाव उंचावलं जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद गोर्डे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीय. कोपर्डी खटल्यातील आरोपींना अहमदनगर जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV