अहमदनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नगर-मनमाड हायवेवर रास्तारोको

10 Nov 2017 09:06 PM

महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यात आता ऊसाच्या हमीभावाचं आंदोलन पेटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतीटन 3 हजार 400 रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको करण्यात आला आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकरी एकत्र आले आणि अहमदनगर-मनमाड राज्यमहामार्गावर रास्तारोको केला.

LATEST VIDEOS

LiveTV