EXCLUSIVE : अहमदनगर : नितीन आगे हत्याप्रकरणातील आरोपींची मुक्तता, नितीनच्या आई-वडिलांशी खास बातचित

25 Nov 2017 08:18 PM

2014 मध्ये अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या नितीन आगेला नेमकं कुणी मारलं ? हा सवाल सध्या अख्खा महाराष्ट्राला पडलाय... कारण अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं हत्या प्रकरणातील सर्व 10 आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केलीये...दलित कुटुंबातीला नितीन आगेची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी आणि भारतीय व्यवस्थेला लागलेल्या जातीव्यवस्थेची कीड अधोरेखित करणारी घटना आहे...हत्येनंतर महाराष्ट्र पेटून उठला, जातीपातीचं राजकारण झालं..दिवस गेले आणि राजकारण विरलं.. मात्र अशी हजारो आगे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत शून्यात नजर लावून बसलीत...

LATEST VIDEOS

LiveTV