अहमदनगर : 'माझा'च्या बातमीनंतर कोपर्डीची बस सेवा पुन्हा सुरु होणार

09 Dec 2017 07:54 PM

कोपर्डीतील बससेवा पुन्हा सुरु करु, असं आश्वासन श्रीगोंदा आगार प्रमुखांनी दिलं आहे. नागरिकांशी चर्चा करुन सोमवारी बस पुन्हा सुरु करु, अशी माहिती त्यांनी दिली. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर एसटी महामंडळाने हे पाऊल उचललं आहे.

गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि आणि ग्रामस्थांशी श्रीगोंदा आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी संवाद साधला. कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच दुसऱ्या दिवशीच श्रीगोंदा ते कोपर्डी ही बससेवा परिवहन महामंडळाने बंद केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV