अहमदनगर : कोपर्डी निकाल 29 नोव्हेंबरला, दोषींना फक्त फाशीच द्या, निर्भयाच्या आईची मागणी

22 Nov 2017 03:57 PM

ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे.

महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी समजणार आहे.

तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV