अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आजपासून

26 Oct 2017 10:45 AM

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज गुरुवारपासून सुनावणी सुरु होणार आहे. गेल्या सुनावणीत आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे गैरहजर राहिल्यानं 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे. खटल्याचं कामकाज 26 ते 29 तारखेपर्यंत शनिवारी आणि रविवारीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोपर्डी खटल्याचा अंतिम युक्तिवाद ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होऊन डिसेंबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV