अहमदनगर : कोपर्डीचा निकाल : समाधानी आहोत, लवकरात लवकर फाशी द्या : गावकरी

29 Nov 2017 12:36 PM

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV