अहमदनगर : आजपासून काँग्रेसच्या जनआक्रोश सप्ताहाला सुरुवात

31 Oct 2017 11:00 AM

फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश सप्ताहाचं आयोजन केलं. आज इंदिरा गांधींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं अहमदनगर जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
तर सांगली जिल्ह्यात या सप्ताहाची सांगता होईल. आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहतील.

LATEST VIDEOS

LiveTV