अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या शिक्षेवर आज युक्तीवाद

21 Nov 2017 11:30 AM

बहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांच्या शिक्षेवर आज नगरच्या जिल्हा न्यायालयात युक्तीवाद होणार आहे. या तिघांनाही कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलय.
बचावपक्षाचे वकील आज दोषींना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली बाजू मांडतील.
दरम्यान तीनही दोषींना फाशी होणार की जन्मठेप याचा फैसला 22 नोव्हेंबरला होणार आहे.
शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आलाय.

LATEST VIDEOS

LiveTV