अहमदनगर : श्रीगोंद्यात काकस्पर्श न झाल्याने बंधाऱ्यातून चक्क पाणी सोडलं!

26 Dec 2017 04:00 PM

अहमदनगर श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्यानं बंधाऱ्यातील पाणी सोडण्याचा प्रकार घडला. शेवाळयुक्त पाणी साचल्याने काकस्पर्श होत नसल्याने गोरे मळ्याजवळील बंधाऱ्यातून लाख मोलाचं पाणी सोडण्यात आले. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी हा अजब निर्णय घेतला.

खरंतर पाण्यावरचं शेवाळ काढणं अपेक्षित होतं किंवा शेवाळास कारणीभूत ठरणारं प्रदूषित पाणी रोखण्याची आवश्यकता असताना, चक्क पाणीच सोडण्यात आलं आहे. या अंधश्रद्धेने मात्र लाखमोलाचं पाणी वाया गेलं.

LATEST VIDEOS

LiveTV