अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतील वूलन कंपनीला भीषण आग

14 Dec 2017 11:45 PM

अहमदनगर औद्योगिक वसाहतीतील एका वूलन कंपनीला भीषण आग लागलीय. संध्याकाळच्या सुमारास या कंपनीला आग लागली. कंपनीतील कापडानं पेट घेतल्यानं काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीन वेढली गेली. ही आग नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र अद्यापही ही आग आटोक्यात आली नसल्याचं समजतंय. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. 

LiveTV