अहमदनगर : नोकरीसाठी 'तो' तरुण मुख्यमंत्र्यांच्या मंचावर धावला

04 Nov 2017 02:54 PM

नोकरीच्या प्रतिक्षेत वारंवार मंत्रालयाचे उंबरठे झिजवूनही काम न झाल्याने आज अहमदनगरमध्ये एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांच्या मंचावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याआधीच तरुणाला ताब्यात घेतलं.  प्रशांत कानडे असं या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुण मूकबधीर असून याआधी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट न होऊ शकल्यानं त्यानं थेट मंचावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या प्रयत्न केला.  

LATEST VIDEOS

LiveTV