अकोला: यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

06 Dec 2017 11:03 AM

शेतीमालाला हमीभावासह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन छेडणाऱ्या यशवंत सिन्हांच्या बंडाचा आज तिसरा दिवस आहे.
मागच्या ३ दिवसांपासून अकोला पोलीस मैदानात यशवंत सिन्हा आणि शेतकरी ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाहीय. आज भाजप नेते शत्रुग्न सिन्हा, अरुण शौरी यासारखी मंडळीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देतील., अशी माहिती आहे. एकीकडे भाजपचेच ज्येष्ठ नेते सरकारविरोधात रस्त्यावर आले असताना दुसरीकडे विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधतायत.
त्यामुळे अकोल्यातील आंदोलनाचा वाढता प्रतिसाद सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV