EXCLUSIVE : भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्याशी खास बातचित

05 Dec 2017 03:42 PM

गुजरातचा रणसंग्राम ऐन भरात असताना भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात हल्लाबोल सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी यशवंत सिन्हा कालपासून अकोला पोलीस मुख्यालयात ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांच्या सातही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर युवा नेते वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा आणि अरुण शौरी हे तिघेही अकोल्यात पोहोचणार आहेत. दरम्यान सोमवारी चुकीच्या पद्धतीनं पोलिसांनी ताब्यात घेऊन थंडीवाऱ्यात उघड्यावर बसवून ठेवल्यानं सिन्हांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हांशी खास बातचित.

LATEST VIDEOS

LiveTV