अकोला : भाजप नेते यशवंत सिन्हा यांचं आंदोलन अखेर मागे

06 Dec 2017 08:45 PM

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यातील शेतकरी आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांशी त्यांची फोनवरुन चर्चा झाली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

“मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या असल्या, तरी या आंदोलनाला विजय-पराजयाच्या दृष्टीने पाहत नाही. दु:खी असलेल्या माणसाचा विजय आहे. हा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळेल.”, अशा भावना यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केल्या. शिवाय, आता येथील शेतकरी आत्महत्या करणार नाही असं अभिवचन द्या, असेही सिन्हांनी आवाहन केले.

शेतकऱ्यांनो कमजोर बनू नका. शेतकऱ्यांना समस्या आल्या तर शेतकरी जागर मंच सोबत संपर्क करा, असं आधारयुक्त आवाहनही सिन्हांनी केलं.

LATEST VIDEOS

LiveTV