अकोला : अकोटमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा, लाखोंचे अवैध फटाके जप्त

15 Oct 2017 02:15 PM

अकोल्यात तब्बल 20 लाखांच्या फटाक्यांच्या अवैध साठ्यावर कारवाई करण्यात आली. अकोटमधल्या तहसील कार्यालयाजवळच्या फटाका गोदामावर पोलिसांनी छापा टाकला आणि हा साठा जप्त केला. विक्रीच्या परवानगीपेक्षा जास्त साठा इथं करण्यात आला होता. शिवाय आग नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना इथं नव्हती. याप्रकरणी आता पोलिसांनी गोदाम मालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV