अलिबाग : आमदार जयंत पाटील चाहत्यांसमोरच शाहरुखवर भडकले!

11 Nov 2017 09:30 PM

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी त्याच्याच चाहत्यांसमोर खडे बोल सुनावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

३ नोव्हेंबरला शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परतत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे इथं आला, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं  निघाली होती.

मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.

LATEST VIDEOS

LiveTV