मुंबई : नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय

25 Nov 2017 09:09 AM

तुमच्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर जर काही लिहिलं असेल आणि दुकानदार ती घेत नसतील तर आता काळजी करायची गरज नाही.

कारण नव्या 500 आणि 2 हजारांच्या नोटांवर जरी लिहिलेलं असेल तरीही त्या बँकाना स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. मात्र, या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

तसेच या नोटांवर रंगही लागला असेल तरी त्या बँकांना स्वीकारणं बंधनकारक असल्याचं आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान अनेक दुकानदार 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आरबीआयकडे आल्या आहेत. पण ते नाणं वैध आहे. असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV