अंबरनाथ : सागर ज्वेलर्सवर धाडसी दरोडा टाकणाऱ्याला अटक, मुद्देमालही जप्त

15 Oct 2017 11:12 AM

अंबरनाथच्या सागर ज्वेलर्सवर धाडसी दरोडा टाकून सुमारे 7 किलो सोनं लंपास करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मुख्य आरोपी विनोद सिंग आणि चोरीचा माल घेणार व्यापारी छबीलदास जुबेलिया यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  मिरारोड येथील राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक कोटी 75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 8 ऑक्टोबरला अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात असलेल्या सागर सराफाच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकून 7 किलो सोनं संपास केलं होतं. त्याची चोरी ज्वेलर्समधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 

LATEST VIDEOS

LiveTV