अंबरनाथ : सूर्योदय सोसायटीतील रहिवाशांना कोट्यवधींचा दंड भरण्याच्या नोटिसा

26 Dec 2017 09:57 AM

अंबरनाथच्या सूर्योदय सोसायटीची ओळख आशियातली सर्वात मोठी सोसायटी अशी आहे. पण य़ाच सोसायटीतले रहिवासी सध्या अडचणीत आले आहेत. शासनाने या भूखंड धारकांना कोट्यवधींचा दंड भरण्याच्या नोटीसा बजावल्यात. या सोसायटीतल्या रहिवाशांनी भूखंड विकत घेताना त्याचं रितसर खरेदीखत केलं नाही आणि सोसायटीनेही तेव्हा मार्गदर्शन केलं नाही. मात्र आता खरेदीत शासकीय अटी-शर्थीचा भंग झाल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिका-यांनी त्यांना कोट्यवधींचा दंड भरण्याच्या सूचना केल्यात. जोपर्यंत दंड भरत नाही, तोपर्यंत खरेदी-विक्रीच्या नोंदणीवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे या सोसायटीचा पुर्नविकासही रखडलाय. यासंदर्भात सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टींशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला

LATEST VIDEOS

LiveTV