अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळ तुटला, RPF कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

29 Dec 2017 09:36 PM

रेल्वे रूळावर लोखंडी रॉडचे तुकडे सापडण्याच्या घटना थांबत नाही. अंबरनाथमध्ये रेल्वेट्रॅकवर 1 फुटाचा तडा गेला. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. सकाळी 7 वाजून 6 मिनिटांची बदलापूर-सीएसएमटी लोकल अंबरनाथ प्लॅटफॉर्मवर आली. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना यांना रेल्वे रूळावर भला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आलं. त्यांनी ताबडतोब अंबरनाथ स्टेशनवरून निघणाऱ्या बदलापूर-सीएसएमटी लोकलकडे धाव घेतली. आणि मोटरमनला लोकल थांबवण्याचा इशारा दिला. यामुळे मोटरमननं इमरजन्सी ब्रेक लावला आणि लोकल थांबवली. यावेळी गाडी वेगात असल्यानं ती थांबेपर्यंत तुटलेल्या रूळावरून लोकलचे तीन डबे पुढे निघून गेले. यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली.

LATEST VIDEOS

LiveTV