आठवडाभर शुगर नियंत्रित राहणार, रोज इन्सुलीनची गरज नाही, अमेरिकेत संशोधन

27 Dec 2017 03:39 PM

तुम्हाला शुगरमुळे रोज इन्सुलिन घ्यावं लागत असेल तर ही बातमी दिलासा देणारी आहे.
कारण अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलंय. त्यांनी एक त्वचेचा तुकडा शोधून काढलाय. जो तुम्ही तुमच्या शरिरावर ठेवला की तुम्हाला आठ दिवस तरी इन्सुलीनचं इंजेक्शन घेण्याची गरज लागणार आही. टाईप टू डायबेटीज असलेल्या रुग्णांना हा लाभ मिळणार आहे.
तसंच हा पॅच त्वचेवर लावताना इंजेक्शनपेक्षा कमी वेदना होतात..या पॅचच्या माध्यमातून इन्सुलिनची गरज पूर्ण केली जाईल..त्यामुळे ज्या पेशंन्टसना इन्सुलिन घेऊन साखरेचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं .. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ बायोमडीकल इमेजिंग आणि बायोइंजिनियरिंगममधील शास्त्रज्ञांनी हा शोध लावलाय.

LATEST VIDEOS

LiveTV