नवी दिल्ली : तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकन 'प्यू' संस्थेचा सर्व्हे

16 Nov 2017 11:12 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही सर्वात लोकप्रिय नेते आहे. अमेरिकन सर्व्हे एजन्सी प्यू रिसर्च सेंटरने हे सर्वेक्षण केलं आहे.

सर्व्हेचे आकडे काय सांगतात?
या सर्व्हेनुसार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 अंकांनी पुढे आहेत. 58 टक्के लोकांना राहुल गांधी आवडतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 88 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून निवड केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना 57 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 39 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत.

कधी झाला सर्व्हे?
21 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजेच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. या सर्व्हेमध्ये देशातल्या 2464 लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते.

LATEST VIDEOS

LiveTV