अमरावती : 23 बँकांच्या एटीएममधून 19 लाखांची लूट, सूत्रधार फरार

05 Dec 2017 09:18 PM

एटीएम नंबरच्या सहाय्यानं एटीएममधून चोऱ्या करणाऱ्या आरोपीला अमरावती पोलिसांनी अटक केली. आरोपीनं गेल्या दोन महिन्यात तब्बल 23 बँकांच्या एटीएममधून 19 लाखांची रोख रक्कम लंपास केली होती. परितोष पोतदार असं या आरोपीचं नाव आहे. बँकांच्या रांगेत उभं राहून एटीएम नंबर पाहायचा. तो नंबर दिल्लीतल्या आपल्या साथीदाराला सांगायचा. त्या मोबदल्यात त्याला 10 टक्के कमिशन मिळायचं. या चोऱ्यांमागे कार्यरत असलेल्या टोळीतल्या मुख्य आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV